जगभरात करोनाचे 6 लाख 77 हजार बळी
देश-विदेश

जगभरात करोनाचे 6 लाख 77 हजार बळी

बाधितांची संख्या 1 कोटी 74 लाख 89 हजार 839

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

नवी दिल्ली | New Delhi -

जगातील अनेक देशांमध्ये करोना विषाणूचा coronavirus प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. जगभरातील एकूण करोनाबाधितांची संख्या 1 कोटी 74 लाख 89 हजार 839 इतकी झाली आहे. तर करोनामुळे आतापर्यंत 6 लाख 77 हजार 024 रुग्णांचा बळी गेला आहे.

एका संकेतस्थळाच्या आकडेवारीनुसार, जगभरात आतापर्यंत एकूण 1 कोटी 9 लाख 52 हजार 345 रुग्णांनी करोनावर मात केली आहे. सध्या जगभरात 58 लाख 60 हजार 470 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर 57 लाख 94 हजार 118 रुग्णांमध्ये करोनाची सौम्य लक्षणे आढळून आली आहेत. तर 66 हजार 352 रुग्णांची स्थिती गंभीर आहे. जगात करोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेत आतापर्यंत 46 लाख 34 हजार 985 जणांना करोनाची लागण झाली आहे. तर 1 लाख 55 हजार 285 लोकांचा मृत्यू झाला आहे.

अमेरिकेनंतर America ब्राझीलमध्ये Brazil सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. ब्राझीलमध्ये 26 लाख 13 हजार 789 करोनाबाधित आहेत तर 91 हजार 377 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर यूकेत 45 हजार 999 लोकांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर तिथे करोनाबाधितांची संख्या 3 लाख 2 हजार 301 इतकी आहे. इटलीत आतापर्यंत 35 हजार 132 रुग्णांचा झाला आहे. तर करोनाबाधितांचा आकडा 2 लाख 47 हजार 158 इतका आहे. अमेरिका, स्पेन, रशिया, ब्राझिल, यूके, इटली, भारत, पेरु, इटली, इराण, मॅक्सिको हे दहा देश असे आहेत. या देशांमध्ये करोना बाधितांचा आकडा 3 लाखांच्या वर गेला आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com