देशात लवकरच 5G सेवा; स्पेक्ट्रमच्या लिलावाला मंजुरी

4G पेक्षा 5G वेगळे कसे?
देशात लवकरच 5G सेवा; स्पेक्ट्रमच्या लिलावाला मंजुरी

दिल्ली | Delhi

भारतात 5G बद्दल चर्चा खूप दिवसांपासून सुरू आहे आणि 5G येण्यापूर्वी अनेक कंपन्यांनी 5G स्मार्टफोन बाजारात आणले आहेत. अशा परिस्थितीत, 5G स्पेक्ट्रमचा प्रस्ताव केंद्रीय मंत्री मंडळापुढे दूरसंचार विभागाने ठेवला होता. या प्रस्तावाला आता मंजूरी देण्यात आली आहे.

सरकारकडून ही मंजुरी मिळाल्यानंतर पुढील महिन्यात 5G स्पेक्ट्रमचा लिलाव सुरू होणार असल्याचे सांगण्यात येते आहे. केंद्र सरकारने 9 स्पेक्ट्रमचा लिलाव करण्याची योजना आखली आहे आणि हा लिलाव 20 वर्षांसाठी असेल. या अंतर्गत 600, 700, 800, 1,800, 2,100, 2,300 आणि 2,500 MHz बँडचा लिलाव होणार आहे. लिलावासाठी स्पेक्ट्रमची एकूण किंमत 5 लाख कोटी रुपये ठेवण्यात आली आहे.

4G पेक्षा 5G वेगळे कसे?

5G अर्थात फिफ्थ जनरेशन ही सेल्युलर नेटवर्कची पाचवी पिढी आहे जी 4G पेक्षा 100 पट वेगवान आहे. यामुळे लोकांसह व्यवसायांसाठी संधी निर्माण करेल अशी अपेक्षा आहे. नेटवर्क क्षमतेत वाढ महत्त्वाची आहे कारण डेटा ट्रॅफिक दरवर्षी सुमारे 60 टक्क्यांनी वाढत आहे.

एखाद्या गर्दीच्या ठिकाणी, एखाद्या स्पोर्ट्स इव्हेंटच्या ठिकाणी 4G नेटवर्कला एकावेळी अनेक उपकरणे (Devices) हाताळताना काही समस्यांना तोंड द्यावे लागले, जी समस्या 5G मध्ये येणार नाही कारण 5G अंतर्गत एकाच वेळी 10 लाख उपकरणे (Devices) हाताळण्यास सक्षम आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com