देशात आजपासून 5G सेवेला सुरुवात, पंतप्रधान मोदींच्या हस्ते शुभारंभ

देशात आजपासून 5G सेवेला सुरुवात, पंतप्रधान मोदींच्या हस्ते शुभारंभ

मुंबई | Mumbai

देशात आजपासून जिओच्या 5G सेवेला सुरुवात होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते 5G सेवेचा शुभारंभ होत आहे. 4G च्या तुलनेत 5G ची सेवा १० पट वेगवान आहे...

१३ शहरांपासून या सेवेची सुरुवात होणार आहे. यासाठी खास मुकेश अंबानी, सुनील भारती मित्तल उपस्थित आहेत. नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर १ ते ४ ऑक्टोबर दरम्यान आयोजित प्रदर्शनात आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते 5G सेवांचा शुभारंभ होत आहे.

देशात आजपासून 5G सेवेला सुरुवात, पंतप्रधान मोदींच्या हस्ते शुभारंभ
Navratrotsav 2022 : नाशिकमधील 'या' दहा देवींचे दर्शन घ्या एका क्लिकवर...

देशात 5G लाँच केल्यानंतर, भारतातील १३ शहरांमध्ये उपलब्ध होईल. २०२२ मध्ये, अहमदाबाद, बेंगळुरू, चंदीगड, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता, चेन्नई, लखनौ, पुणे, दिल्ली आणि मुंबई सारखी शहरे ५जी सेवा प्राप्त करणारी पहिली शहरे असतील.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com