देशात गेल्या २४ तासांत ५७ हजार नवे रुग्ण

तर ७६५ करोना बाधितांचा मृत्यू
देशात गेल्या २४ तासांत ५७ हजार नवे रुग्ण
करोना अपडेट

मुंबई | Mumbai

भारताभोवती कोविड-19 चा विळखा अधिकाधिक घट्ट होत चालला असून दिवसागणिक करोना बाधितांची संख्या देखील वाढत चालली आहे. भारत केंद्र सरकार आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या ताज्या अपडेट्सनुसार, देशात मागील 24 तासात 57,117 नवे रुग्ण आढळले असून 765 रुग्ण दगावल्याची माहिती मिळत आहे.

यामुळे देशात करोना बाधितांची एकूण संख्या 16 लाख 95 हजार 988 वर पोहोचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 36, 511 वर पोहोचला आहे. सद्य घडीला भारतात 5,65,103 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

भारतात काल दिवसभरात 36, 568 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 10, 94, 374 रुग्णांनी करोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. भारतात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात असून येथील रुग्णांचा एकूण आकडा 4 लाख 22 हजार 118 वर पोहोचला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com