
नवी दिल्ली | New Delhi
इस्त्रायल आणि हमास (Israel and Hamas) दहशतवाद्यांमध्ये सुरु असलेल्या संघर्षाने गंभीर स्वरुप धारण केले असून या संघर्षामध्ये आतापर्यंत ५०० हून अधिक लोकांचा मृत्यू (Death) झाला आहे. तर हमासच्या हल्ल्यात (Attack) ३०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असून इस्त्रायलच्या प्रतिहल्ल्यात २३० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर या हल्ल्यात सुमारे १५०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत.
इस्रायलमध्ये हमासने जमीन, वायू आणि पाणी अशा तिन्ही मार्गांनी हल्ला केला आहे. इस्रायलवर गोळीबार (Firing) करत हमासच्या दहशतवाद्यांनी (Terrorists) अनेकांना ओलिस ठेवल्याची माहिती समोर आली आहे. हमासने ओलिस ठेवलेल्यामध्ये इस्रायली नागरिक आणि सैनिकांचा समावेश आहे. दरम्यान, हमासने नेमके किती ओलिस ठेवले आहेत, याबाबत स्पष्ट माहिती मिळालेली नाही. तर हमासचे दहशतवादी इस्रायलींचे अपहरण करून त्यांना गाझामध्ये (Gaza) आणत आहेत.
काल म्हणजेच शनिवारी सकाळी हमास दहशतवादी संघटनेने (Terrorist organization) इस्त्रायलवर रॉकेट हल्ला (Rocket Attack) केला. त्यावेळी २० मिनिटांत तब्बल ५००० रॉकेट गाझा पट्टीतून इस्त्रायलच्या प्रदेशात डागण्यात आले. यात इस्त्रायलचे मोठे नुकसान झाल्याचे बोलले जात असून त्यात वित्त आणि जीवितहानीचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. तर हमासने केलेल्या हल्ल्याचे वर्णन इस्रायल संरक्षण दलाने 'प्रचंड' असे केले आहे. इस्रायलवर अडीच हजार रॉकेटचा मारा करण्यात आला. त्याचबरोबर हमासचे दहशतवादी मजबूत तटबंदी असलेल्या सीमेवरून हवाई आणि समुद्रमार्गे इस्रायलच्या अनेक भागांत घुसले, असे सांगण्यात आले.
दरम्यान, युद्धाच्या घोषणेनंतर काही देशांनी इस्त्रायला पाठिंबा दिला तर काहींनी पॅलेस्टिनींचे समर्थन केले आहे. अमेरिका इस्त्रायलच्या बाजूने भक्कमपणे उभा राहिला असून भारतानेही (India) इस्त्रायलसोबत असल्याचे म्हटले आहे. तसेच दुसरीकडे कतार, अफगाणिस्तान, पाकिस्तान या देशांनी पॅलेस्टिनला पाठिंबा जाहीर केला आहे.