विशेष श्रमिक रेल्वेमुळे मिळाले 428 कोटी

माहिती अधिकारात स्पष्ट
विशेष श्रमिक रेल्वेमुळे मिळाले 428 कोटी

मुंबई | Mumbai - लॉकडाऊन कालावधीतदेशभरात अडकलेल्या मजूर, श्रमिकांसाठी विशेष रेल्वेगाडीचे नियोजन केले होते. Shramik Special trains या विशेष रेल्वेमधून सुमारे 63 लाख श्रमिकांनी प्रवास केला आणि भारतीय रेल्वेला जून अखेरीपर्यंत 428 कोटी रुपयांचे उत्पन्न झाले, असे माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीतून स्पष्ट झाले आहे.

रेल्वे मंत्रालय, रेल्वे मंडळाकडून माहिती अधिकार कार्यकर्ते अजय बोस यांनी ही माहिती मिळविली आहे. त्यानुसार, 1 मे पासून श्रमिक विशेष रेल्वेगाडी सुरू झाली, तेव्हापासून ते 29 जूनपर्यंत या विशेष रेल्वेगाडीमधून 62 लाख 91 हजार 126 मजूर आपल्या मूळगावी पोहोचले आहेत.

या श्रमिक विशेष रेल्वे गाड्या आंध्रप्रदेश, आसाम, बिहार, छत्तिसगड, गुजरात, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, झारखंड, कर्नाटक, केरळ, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, मिझोराम, नागालॅण्ड, ओडिशा, राजस्थान, तामिळनाडू, तेलगंणा, त्रिपुरा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड व पश्चिम बंगाल या राज्यात गेल्या. यातून भारतीय रेल्वेला एकूण 428 कोटी उत्पन्न मिळाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com