दिल्लीत अडीच हजार कोटींचेे हेरॉईन जप्त

दिल्लीत अडीच हजार कोटींचेे हेरॉईन जप्त

चार जणांना अटक

नवी दिल्ली / New Delhi - दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी 2500 कोटी किंमतीचे 350 किलो हेरॉईन (heroin) जप्त केले आहे. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या आरोपींपैकी तीन जणांना हरियाणा आणि एकाला दिल्लीहून अटक केली आहे.

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने (Delhi Police Special Cell) ही कामगिरी केली आहे. हे प्रकरण नार्को टेररिझमशी संबंधित असू शकते. त्या दृष्टीने तपास सुरु आहे. या सिंडिकेटचा पाकिस्तानशीही संबंध जोडला जाण्याची शक्यता आहे.

दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाचे पोलीस आयुक्त नीरज ठाकूर यांनी सांगितले, हे ऑपरेशन अनेक महिन्यांपासून सुरू आहे. एकूण 350 किलो हेरॉईन जप्त करण्यात आली असून एका अफगाण नागरिकाला अटक केली आहे. कंटेनरमध्ये लपवून हेरॉईनचा माल समुद्रमार्गे मुंबईहून दिल्लीला आला. मध्य प्रदेशातील शिवपुरी जवळील कारखान्यात ड्रग्स अधिक दर्जेदार बनविली जात होती. त्यानंतर ड्रग्स पंजाबला पाठवले जात होते. तसेच फरीदाबादमध्ये ड्रग्स लपविण्यासाठी भाड्याचे घर घेतले गेले होते. अफगाणिस्तानात बसलेले आरोपी हे रॅकेट चालवत होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com