ईदच्या मिरवणुकीत मोठा स्फोट; पोलिस अधिकाऱ्यासह 34 ठार, अनेक जखमी

ईदच्या मिरवणुकीत मोठा स्फोट; पोलिस अधिकाऱ्यासह 34 ठार, अनेक जखमी

दिल्ली | Delhi

पाकिस्तानमधील बलूचिस्तानमध्ये एका मशिदीजवळ बॉम्बस्फोट झाला आहे. या आत्मघाती हल्ल्यात 34 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी मस्तुंग जिल्ह्यात झाली.

बलुचिस्तानमधील मस्तुंग जिल्ह्यातील अल-फलाह मशिदीजवळ ईद मिलाद-उल-नबीच्या मिरवणुकीला लक्ष्य करून स्फोट घडवण्यात आला आहे. या भीषण घटनेत जखमी झालेल्या नागरिकांवर जवळील रूग्णालयामध्ये उपचार सुरू असून, घटनेची दाहकता बघता मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रुग्णालयांमध्ये आपत्कालीन परिस्थिती घोषित करण्यात आली आहे. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना तातडीने पोहोचण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ईदच्या मिरवणुकीत मोठा स्फोट; पोलिस अधिकाऱ्यासह 34 ठार, अनेक जखमी
माणुसकी ओशाळली! अल्पवयीन मुलीवर अत्याचार, मदतीसाठी अर्धनग्न आणि रक्तबंबाळ अवस्थेत दारोदार फिरली पण...
ईदच्या मिरवणुकीत मोठा स्फोट; पोलिस अधिकाऱ्यासह 34 ठार, अनेक जखमी
एकलहरे-बेलापूर रस्त्यावर दरोडा; तरुणाची निर्घृणपणे हत्या, पत्नीला जबर मारहाण

अद्यापर्यंत या स्फोटाची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही. याआधी मस्तुंग जिल्ह्यात सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीला एक भीषण स्फोट घडवून आणण्यात आला होता. त्यात जमियत उलेमा-ए-इस्लाम फझलचे (JUI-F) नेते हाफिज हमदुल्लासह अनेक जण जखमी झाले होते. त्यानंतर महिनाभरात झालेला हा दुसरा भीषण स्फोट आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com