श्रीनगरमध्ये ३ अतिरेक्यांचा खात्मा, वर्षभरात १७१ अतिरेक्यांना कंठस्नान

श्रीनगरमध्ये ३ अतिरेक्यांचा खात्मा, वर्षभरात १७१ अतिरेक्यांना कंठस्नान
File Photo

दिल्ली | Delhi

जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर जिल्ह्यातील पंथाचौक (Shrinagar Encounter) भागात आज शुक्रवारी पहाटेच्या सुमारास सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये तीन दहशतवादी (Terrorist) ठार झाले, तर जम्मू-काश्मीर पोलीस दलातील तीन जवान आणि केंद्रीय राखीव पाोलिस दलाचा एका जवान जखमी झाले.

पंथाचौक भागातील एका इमारतीमध्ये काही दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली. त्यानुसार पोलिस आणि सुरक्षा दलांनी त्या परिसराला घेराव घालत टप्प्याटप्याने पुढे जायला सुरुवात केली. दरम्यान इमारतीमध्ये लपलेल्या दहशवाद्यांनी गोळीबार केला, यामध्ये जम्मू-काश्मीर पोलीस दलातील तीन जवान आणि केंद्रीय राखीव पाोलिस दलाचा एका जवान जखमी झाले.

गेल्या २४ तासांत ९ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. गुरुवारी सैन्याला मोठं यश मिळालं होतं. जम्मू आणि काश्मीरमधील कुलगाम आणि अनंतनाग जिल्ह्यांमध्ये झालेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आलं होतं. यामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाला होता. यासंदर्भातील माहिती स्थानिक पोलीस प्रशासनानेच दिली आहे.

दरम्यान वर्षभरात १७१ अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना यश आल्याची माहिती आईजीपी विजय कुमार यांनी दिली आहे. या १७१ अतिरेक्यांमध्ये १९ पाकिस्थानी तर १५२ स्थानिक अतिरेकी होते. तसेच गेल्या वर्षी ३७ स्थानिक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. या वर्षी ३४ स्थानिक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com