
दिल्ली | Delhi
जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. पुलवामा (Pulwama) येथे शनिवारपासून सुरू झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाने तीन दहशतवाद्यांचा खात्मा (terrorist killed) केला आहे.
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे ठार झालेले तीन दहशतवादी स्थानिक असून ते लष्कर-ए तैयबाशी (LeT) संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे.
काश्मीर झोनचे पोलिस महानिरीक्षक विजय कुमार यांनी सांगितले की, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ठार झालेले तीन दहशतवादी स्थानिक होते आणि ते पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाशी संबंधित होते. परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे.
दरम्यान चकमक ज्या ठिकाणी झाली त्या ठिकाणाहून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये ३०३ रायफल, २३ राऊंड काडतुसे, एक पिस्तूल आणि ३१ राऊंड काडतुसे, एक हँडग्रेनेड तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.