34 पॉझिटिव्ह
34 पॉझिटिव्ह
देश-विदेश

मल्टीनॅशनल कंपनीतील 288 कर्मचारी करोना पॉझिटिव्ह

४०० कर्मचाऱ्यांचा अहवाल येणे बाकी

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

हरिद्वार | Haridwar - हरिद्वारमधील एका मल्टीनॅशनल कंपनीतील 288 कर्मचारी employees करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. हे कर्मचारी वेगवेगळ्या भागातील असून ते सामान्य लोकांच्या संपर्कात आल्याचेही सांगितले जात आहे.

प्रशासन आता या मल्टीनॅशनल कंपनीतील multinational company कर्मचार्‍यांची कॉन्टेक्ट हिस्ट्री Contact History तपासून पाहत आहे. याच कंपनीतील इतर 400 कर्मचार्‍यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्याचा रिपोर्ट येणे बाकी आहे.

करोना विषाणूच्या संसर्गाची स्थिती पाहता कंपनीच्या आजू-बाजूचा परिसर रिकामा करण्यात आला आहे. कंपनीच्या कर्मचार्‍यांना संसर्ग झाल्यानंतर, त्यांची कॉन्टेक्ट हिस्ट्री आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी 164 लोकांची टीम कामाला लागली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com