26/11 Mumbai Attack : २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याला १३ वर्षे पूर्ण, शहीदांना देशभरातून श्रद्धांजली

26/11 Mumbai Attack : २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याला १३ वर्षे पूर्ण, शहीदांना देशभरातून श्रद्धांजली

मुंबई l Mumbai

२६ नोव्हेंबर २००८ च्या मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला १३ वर्षे पूर्ण होत आहेत. या दहशतवादी हल्ल्यात १९७ निष्पाप नागरिकांचा जीव गेला होता. तर, ३०० हून अधिक जण जखमी झाले होते. या हल्ल्यात मृत्यू झालेल्या नागरिकांमध्ये केवळ भारतीय नाही तर परदेशी नागरिकांचाही समावेश होता.

या आत्मघाती हल्ल्यात पाकिस्तानमधून आलेल्या १० पैकी ९ दहशतवाद्यांना भारतीय सुरक्षा यंत्रणांनी कंठस्नान घातले होते. या कारवाईमध्ये अजमल कसाब हा एकमेव दहशतवादी जिवंत पकडत त्याला फासावर लटकवले. याच पार्श्वभूमीवर देशभरातून या हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. तसेच राजकीय नेत्यांनी या हल्ल्यात शहीद झालेल्यांना ट्विट करत श्रद्धांजली वाहिली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com