कर्नाटक हादरले! ऑक्सिजनअभावी २४ रुग्णांचा तडफडून मृत्यू

कर्नाटक हादरले! ऑक्सिजनअभावी २४ रुग्णांचा तडफडून मृत्यू

दिल्ली l Delhi

करोनाच्या दुसऱ्या लाटेचा तडाखा देशाला बसला असून, संसर्ग प्रसाराच्या वेगाने आरोग्य व्यवस्थेला वेठीस धरलं आहे. वाढती रुग्णसंख्या, ऑक्सिजन आणि इतर सामग्रीचा निर्माण झालेला तुटवडा यामुळे कोरोनाचे संकट आणखी गडद होत चालले आहे. देशात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्यू होत असल्याची प्रकरणे थांबत नाही आहेत.

कर्नाटकमधील चामराजनगर जिल्हा रुग्णालयात सोमवारी मोठी दुर्घटना घडली आहे. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे २४ जणांचा बळी गेल्याच धक्कादायक घटना समोर आली आहे. प्राण गमावणाऱ्या रुग्णांत कोविडबाधित तसंच इतर रुग्णांचाही समावेशी आहे. ज्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे ते सगळे रुग्ण व्हेन्टिलेटरवर होते. यापूर्वी दिल्लीतील बत्रा रुग्णालयात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे ८ रुग्णांचा मृत्यू झाला होता.

कर्नाटकाचे आरोग्य मंत्री डॉ.के सुधाकर यांनी म्हटले की, 'चामराजनगर मधील ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली असून मैसूर, मंड्या आणि चामराजनगर येथे जाणार आहे. तेथे झालेल्या मृत्यूसंदर्भातील आढावा घेण्यासह समस्येचे निराकरण करण्याचा ही पूर्णपणे प्रयत्न करणार आहे'.

तसेच, ‘करोना रुग्णांसह एकूण २४ उपचाराधीन रुग्णांचा ऑक्सिजन तुटवडा आणि इतर कारणांमुळे चमराजनगर जिल्हा रुग्णलायात २४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आम्ही सध्या मृत्यूच्या अहवालाची प्रतिक्षा करत आहोत,’ असं जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश कुमार यांनी म्हटलं आहे. दरम्यान, मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी चमराजनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्याचबरोबर या घटनेची दखल घेऊन उद्या मंत्रिमंडळाची बैठकही बोलावली आहे.

यापूर्वी कालाबुर्गी मधील केबीएन रुग्णालयात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याच दिवशी यदगिरी शासकीय रुग्णालयात लाइट गेल्याने व्हेंटिलेटरवर आलेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाला. गेल्या एका आठवड्यात कर्नाटक येथील काही रुग्णालयांमध्ये काही लोकांचा सुद्धा ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या कर्नाटक येथे करोनाबाधितांचा आकडा १६ लाखांच्या पार गेला आहे. रविवारी ३७ हजार नव्या रुग्णांची भर पडली असून २१७ जणांचा बळी गेला आहे. करोनाग्रस्तांना ऑक्सिजन आणि बेड्सचा तुटवड्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.

दरम्यान, या घटनेवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये राहुल गांधी म्हणतात, मेले की मारलं? त्यांच्या कुटूंबियांबद्दल मी मनापासून संवेदना व्यक्त करतो. व्यवस्थेला जाग येण्याआधी अजून असा किती त्रास सहन करावा लागणार आहे?

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com