22 हजार कोटींच्या घोटाळ्याने बँकींग क्षेत्राला हादरा

22 हजार कोटींच्या घोटाळ्याने बँकींग क्षेत्राला हादरा

सुरत -

इतिहासातील सर्वात मोठ्या घोटाळ्याने बँकींग क्षेत्राला जबर धक्का दिला आहे. एबीजी शिपयार्ड या कंपनीने तब्बल 28 बँकांना 22 हजार 842 कोटी रुपयांना फसवले. आजवरच्या सर्व बँकींग घोटाळ्यांपेक्षा ही रक्कम मोठी आहे.

याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने एबीजी शिपयार्डचे तत्कालीन अध्यक्ष ऋषी कमलेश अग्रवाल याच्यासह 8 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही शिपयार्ड कंपनी जहाज निर्मिती आणि दुरुस्तीाचे काम करते. या कंपनीचे गुजरातमधील दहेज आणि सूरत येथे शिपयार्ड आहेत. हा घोटाळा एप्रिल 2012 ते जुलै 2017 यादरम्यान झाला आहे. सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार, एबीजी शिपयार्ड आणि एबीजी इंटरनॅशनल या घोटाळा करणार्‍या दोन प्रमुख कंपन्या आहेत. या दोन्ही कंपन्या एकाच ग्रुपच्या आहेत. हा घोटाळा नीरव मोदीच्या घोटाळ्यापेक्षाही मोठा आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com