
नवी दिल्ली | New Delhi
अफगाणिस्तानमधील (Afghanistan) पश्चिम भागात भूकंपाचे (Earthquakes) जोरदार धक्के बसले असून एकापाठोपाठ आलेल्या भूकंपाच्या पाच धक्यानंतर अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. या भूकंपात दोन हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू (Death) झाल्याची माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. तर या भूकंपाची तिव्रता रिश्टर स्केलवर ६.३ इतकी मोजण्यात आली आहे...
आफगाणिस्तानात झालेल्या या भूकंपामुळे मृतांची संख्या अजून वाढण्याची शक्यता असून या भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तानमधील सर्वात मोठे शहर हेरातपासून ४० किमी नॉर्थ वेस्टमध्ये होते. अमेरिकेच्या (America) भूगर्भशास्त्र विभागाच्या (Department of Geology) नोंदीनुसार रिश्टर स्केलवर पश्चिम अफगाणिस्तान ६.३ तीव्रतेचे दोन धक्के बसले. भूकंपानंतर ५.५ तीव्रतेचा धक्का जाणवल्यानंतर अनेक लोक घराबाहेर पडले.
दरम्यान हा भूकंप आल्यानंतर अनेक लोक आपली घरे सोडून पळू लागल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाले आहेत. तसेच हेरातला अफगाणिस्तानची सांस्कृतिक राजधानी म्हटले जाते. येथे तब्बल १९ लाख लोक राहतात. मागील वर्षी अफगाणिस्तानात आलेल्या भूकंपात कमीत कमी १००० लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पुन्हा भूकंप झाला असून आतापर्यंत २००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच या भूकंपानंतर कार्यालये आणि दुकाने रिकामी करण्यात आली असून आणखी हादरे बसण्याचे भय लोकांना वाटत असल्याचे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे.