आयपीएल 2020 हिट

पहिल्याच सामन्यासाठी 20 कोटी प्रेक्षक
आयपीएल 2020 हिट

नवी दिल्ली -

आयपीलच्या 13 व्या हंगामाला दुबईमध्ये सुरुवात झाली असून मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्जच्या पहिल्याच सामन्याने जागतिक

विक्रम केला आहे. जगभरातून 20 कोटी लोक एकाच वेळी हा सामना पाहत होते. बीसीसीआयचे सेक्रेटरी जय शाह यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्विट केले आहे की, आयपीएलच्या पहिल्या सामन्याने नवा विक्रम केला आहे. बार्क नुसार, अभूतपूर्व प्रतिसादासोबत 20 कोटी लोकांनी सामना पाहिला. कोणत्याही देशातील क्रीडा स्पर्धेला इतक्या प्रमाणात दर्शक मिळालेले नाहीत. कोणत्याही लीगला सुरुवातीलाच इतका मोठा प्रतिसाद मिळालेला नाही.

दरम्यान 19 सप्टेंबरला झालेल्या पहिल्याच सामन्यात चेन्नईने मुंबईचा पराभव केला. चेन्नईने मुंबईवर 5 गडी राखून विजय मिळवला होता.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com