जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश
file photo

दिल्ली | Delhi

जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. जम्मू-काश्मीरमधील कुपवाडामध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

लष्कर-ए-तोयबा (LeT) या प्रतिबंधित दहशतवादी (Terrorists) संघटनेचे दोन दहशतवादी ठार झाले आहेत. यामध्ये पाकिस्तानी दहशतवादी (Pakistani Terrorist) तुफैलचा (Tufail) समावेश आहे.

जम्मू-काश्मीर पोलिसांनी (Jammu and Kashmir police) सांगितले की, त्यांना कुपवाडा येथील चक्र कांडी येथे दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. माहिती मिळाल्यानंतर लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त पथकानं सर्च ऑपरेशन सुरू केलं. स्वत:ला वेढलेले पाहून दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला.

दरम्यान जम्मू-काश्मीर खोऱ्यात स्थलांतरित मजूर आणि काश्मिरी हिंदू हे दहशतवाद्यांचे लक्ष्य आहेत. २६ दिवसांत टार्गेट किलिंगच्या १० घटनानंतर खोऱ्यातून स्थलांतर झाल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत. टार्गेट किलिंगच्या सततच्या घटनांमुळे काश्मिरी हिंदूंमध्ये अशी भीती निर्माण झाली आहे की त्यांना केव्हाही, कुठेही गोळ्या घातल्या जाऊ शकतात.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com