विमान आणि ट्रकचा विचित्र अपघात; घटनेचा थरारक VIDEO समोर

विमान आणि ट्रकचा विचित्र अपघात; घटनेचा थरारक VIDEO समोर

पेरु | Peru

पेरुच्या लीमा विमानतळावर (Lima airport) विमान आणि ट्रकचा विचित्र अपघात झाला आहे. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय.

अग्निशमन दलाच्या ट्रकची विमानाला धडक झाल्यानंतर विमानाला मोठी आग लागली. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून विमानातील सर्व प्रवासी सुखरुप आहेत. या विमानामध्ये १०२ प्रवासी आणि सहा क्रू मेंबर्स होते.

या थरारक घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एका व्हिडीओमध्ये प्रवासी विमान धावपट्टीवरून जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या अग्निशमन दलाच्या ट्रकला धडकताना दिसत आहे. तर दुसऱ्या एका व्हिडीओत धडकेनंतर विमानाने पेट घेतल्याची दृश्य कैद झाली आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com