धक्कादायक! १२वीत शिकणाऱ्या तरुणीला जिवंत जाळले, उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू

धक्कादायक! १२वीत शिकणाऱ्या तरुणीला जिवंत जाळले, उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू

दिल्ली | Delhi

झारखंडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. झारखंडमधील दुमका येथे १२ वीत शिकणाऱ्या तरुणीला शाहरुख नावाच्या तरुणाने एकतर्फी प्रेमातून जिवंत जाळल्याची घटना घडली होती.

या घटनेनंतर पीडितेला रांची येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, पीडिता ९० टक्के भाजलेल्यामुळे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्यानंतर प्रशासनाकडून परिसरात कलम १४४ लागू करण्यात आला आहे. नागरिकांनी रस्त्यावर येत रोष व्यक्त केला तसेच आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com