महापौरांसह १८ जणांचा अंदाधुंद गोळीबारात जागीच मृत्यू

महापौरांसह १८ जणांचा अंदाधुंद गोळीबारात जागीच मृत्यू

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

अमेरिकेतील मेक्सिकोच्या मेक्सिकन सिटी (Mexico Firing) हॉलमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. येथील सिटी हॉलमध्ये सामूहिक गोळीबार झाला आहे...

गोळीबारात किमान 18 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. मृतांमध्ये महापौरांचाही समावेश असल्याचे समजते. मेक्सिकोमध्ये ही घटना बुधवारी घडली.

महापौरांसह १८ जणांचा अंदाधुंद गोळीबारात जागीच मृत्यू
Video : नाशिकच्या शिंदे-ठाकरे समर्थकांमध्ये राडा

याबाबत अधिक माहिती अशी की, मेक्सिकन सिटी हॉलमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अचानक एक अज्ञात व्यक्ती कार्यक्रमात शिरली आणि अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात १८ जणांचा मृत्यू झाला.

महापौरांसह १८ जणांचा अंदाधुंद गोळीबारात जागीच मृत्यू
दांडिया खेळण्याच्या कारणावरून धारदार शस्त्राने युवकाची हत्या

तेथील महापौरांशिवाय त्यांचे वडील, माजी महापौर आणि महापालिका पोलिसातील अनेक अधिकाऱ्यांचा मृतांमध्ये समावेश आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com