धक्कादायक : शेजारी राहणार्‍या मित्राने झाडल्या 16 वर्षीय मुलीवर गोळ्या!

धक्कादायक : शेजारी राहणार्‍या मित्राने झाडल्या 16 वर्षीय मुलीवर गोळ्या!

नवी दिल्ली | New Delhi

होलिका दहनाच्या दिवशी 16 वर्षीय मुलीवर प्राणघातक हल्ला (16 Year Girl Attack) करण्यात आला. शेजारी राहणार्‍या मित्राने मुलीवर बंदुकीने गोळ्या झाडल्या (Gun Fired). या घटनेनंतर शहरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. आरोपी फरार असून पोलीस (Police) शोध घेत आहेत.

सविस्तर माहिती अशी की, दिल्लीतील (Delhi) सुभाष पार्क नंद नगरीमध्ये एका 16 वर्षीय मुलीवर सोमवारी (6 मार्च)ला शेजारच्या मुलाने प्राणघातक हल्ला (Attack) केला आहे. रागाच्या भरात या तरुणाने 16 वर्षीय मुली बंदुकीने गोळ्या (Gun Fired) झाडल्या आहेत. मुलीच्या खांद्याला गोळी लागली असून तिच्यावर दिल्लीतील (Delhi) जीटीबी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पीडित तरुणीची प्रकृती आता स्थिर असल्याचं सांगण्यात आलं आहे. हा तरुण त्या मुलीच्या घराच्या शेजारी राहत होता आणि तिचा मित्र (Friend) होता. दरम्यान मैत्रिणीवर गोळी झाडल्यानंतर त्या मुलाने तिथून पळ काढला आहे. दिल्ली पोलीस (Delhi Police) त्या तरुणाचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी आरोपीविरोधात आयपीसी 307 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला शोधण्यासाठी अनेक पथकं तयार करण्यात आल्याच पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com