भूस्खलन : 15 मजूरांचा मृत्यू; 60 अडकले
देश-विदेश

भूस्खलन : 15 मजूरांचा मृत्यू; 60 अडकले

राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (NDRF) तैनात

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

तिरुअनंतरपुरम | Thiruvananthapuram -

मुसळधार पावसामुळे केरळातील इडुकी जिल्ह्यात राजमाला परिसरात मोठी दुर्घटना घडली आहे. एका क्षणात डोळ्या देखत अख्खी वस्ती जमीनदोस्त झाली. landslide in Kerala's Idukki district जवळपास 80 हून अधिक मजूर राहात असणार्‍या ठिकाणी मोठी भूस्खलनाची दुर्घटना घडली आहे.

या भूस्खलनात 60 हून अधिक मजूर दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान आतापर्यंत या दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण काही मजुरांना जिवंत बाहेर काढण्यात आले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

भूस्खलनात अडकलेल्या मजुरांना वाचवण्यासाठी तातडीने राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (NDRF) तैनात करण्यात आले. National Disaster Response Force (NDRF) घटनास्थळी पोलिस,अग्निशमन दलाचे जवान, वन विभागाची पथके, तसेच राज्याच्या महसूल विभागाचे अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले असून, येथील बचावकार्य अधिक जलदगतीने सुरू करण्यात आले आहे. हे ठिकाण अडचणीचे असल्याने येथे बचावकार्यात देखील अडचणी येत आहेत. ज्या ठिकाणी भूस्खलन झालं तिथे चहाच्या बागेत काम करणारे मजूर राहात होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com