Plane Crash News : पर्यटकांना घेऊन जाणारे विमान कोसळले; पायलटसह १४ प्रवाशांचा मृत्यू

Plane Crash News : पर्यटकांना घेऊन जाणारे विमान कोसळले; पायलटसह १४ प्रवाशांचा मृत्यू

नवी दिल्ली | New Delhi

ब्राझीलमधील (Brazil) उत्तरेकडे असणाऱ्या अ‍ॅमेझॉन राज्यात (Amazon State) पर्यटकांना घेऊन जाणारे एक खासगी विमान कोसळल्याने (Plane Crash) भीषण अपघात (A Terrible Accident) झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात १४ जणांचा मृत्यू (Death) झाला असून मृतांमध्ये १२ प्रवासी आणि २ क्रू मेंबर्सचा समावेश आहे. तर अपघातात मृत्यूमुखी पडलेले १२ प्रवाशी हे अमेरिकन पर्यटक असल्याचे बोलले जात आहे...

Plane Crash News : पर्यटकांना घेऊन जाणारे विमान कोसळले; पायलटसह १४ प्रवाशांचा मृत्यू
PM Narendra Modi Birthday : लहानपणीचे कष्टाळू, गुजरातचे मुख्यमंत्री ते जगातील प्रभावशाली नेते पंतप्रधान मोदी

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ब्राझीलच्या स्थानिक वेळेनुसार दुपारी ३ वाजता हा अपघात झाला आहे. तर खराब हवामानामुळे (Bad Weather) ही दुर्घटना घडली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तसेच लँडिंगच्या वेळी मुसळधार पाऊस (Rain) पडत होता. त्यावेळी विमान उतरण्याच्या प्रयत्नात असताना कमी दृष्यमानतेमुळे हा अपघात झाला असावा, असे सांगितले जात आहे.

Plane Crash News : पर्यटकांना घेऊन जाणारे विमान कोसळले; पायलटसह १४ प्रवाशांचा मृत्यू
Accident News : पर्यटकांची कार दरीत कोसळून भीषण अपघात; तीन ठार, चार जण गंभीर जखमी

तर अ‍ॅमेझॉन राज्याचे राज्यपाल विल्सन लिमा (Governor Wilson Lima) यांनी प्रतिक्रिया देतांना म्हटले की, 'विमान अपघातात बारा प्रवाशी आणि दोन क्रू मेंबरच्या मृत्यूमुळे अतिव दु:ख झाले आहे. आवश्यक ती मदत देण्यासाठी आमची टीम मदत करत आहे. माझी सांत्वना आणि पार्थना त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहेत', असे त्यांनी सांगितले.

Plane Crash News : पर्यटकांना घेऊन जाणारे विमान कोसळले; पायलटसह १४ प्रवाशांचा मृत्यू
Accident News : कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या बसला अपघात; एकाचा मृत्यू, १५ हून अधिक जखमी

तसेच हे विमान मनाऊस एरोटॅक्सी एअरलाईनचे (Manaus Aerotaxi Airline) होते. त्यामुळे कंपनीने देखील या दुर्घटनेला दुजोरा देणारे निवेदन जारी केले असून विमान दुर्घटनेचा तपास सुरू आहे. मात्र, अद्याप याप्रकरणी पुरेशी माहिती मिळालेली नाही, असे कंपनीने म्हटले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

Plane Crash News : पर्यटकांना घेऊन जाणारे विमान कोसळले; पायलटसह १४ प्रवाशांचा मृत्यू
New Parliament : नव्या संसद भवनावर फडकला तिरंगा; उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते ध्वजारोहण
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com