दुर्दैवी! चीनमध्ये कोसळलेल्या विमानातील १३२ प्रवाशांचा मृत्यू

दुर्दैवी! चीनमध्ये कोसळलेल्या विमानातील १३२ प्रवाशांचा मृत्यू

बीजिंग | Beijing

चीनमधील विमान अपघाताची (China Plane Crash) एक मोठी बातमी समोर येत आहे. या भीषण अपघातात वैमानिकासह १३२ जणांचा मृत्यू झाल्याचे समजते...

आतापर्यंत सुमारे १२० प्रवाशांची ओळख पटली आहे. तर ब्लॅक बॉक्सचा शोध सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. अजूनही काही अवशेष मिळणे बाकी असल्याचे सांगितले जात आहे. ही दुर्घटना नेमकी कशामुळे झाली याचे कारण अद्याप समोर आले नाही.

दरम्यान, हे अपघातग्रस्त विमान (boing 737) चायना इस्टर्न एअरलाइन्सचे (hina Eastern Airlines aircraft) असून १३३ प्रवाशांना घेऊन कुनमिंग (Kunming) येथून ग्वांझाऊ (Guangzhou) येथे जात होते.

हे विमान डोंगर असलेल्या ठिकाणी कोसळल्याची माहिती मिळाली होती. शनिवारी दुर्घटनास्थळावरून विमानाचे अवशेष, मृतदेह ताब्यात घेण्यात आले.

Related Stories

No stories found.