
नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
आफ्रिकन देश असलेल्या मादागास्करमध्ये (Madagascar) आयोजित इंडियन ओशन आयलँड गेम्सच्या (Indian Ocean Island Games) उद्घाटन समारंभात चेंगराचेंगरी (Stampede) झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला असून ७० हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेवर मादागास्करच्या राष्ट्राध्यक्षांनी शोक व्यक्त केला आहे....
याबाबत तेथील स्थानिक वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, मादागास्करमधील बारिया स्टेडियमवर (Baria Stadium) शुक्रवारी इंडियन ओशन आयलँड गेम्सचा (IOIG) उद्घाटन सोहळा पार पडला. या कार्यक्रमासाठी जवळपास ५० हजार प्रेक्षक आले होते. सदर कार्यक्रमावेळी स्टेडियमच्या प्रवेशद्वारावर चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत तब्बल १२ जणांचा मृत्यू (Death) झाला. तर ७० हून अधिक जण गंभीर जखमी झाले असून त्यापैकी ११ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
दरम्यान, या घटनेनंतर मादागास्करचे पंतप्रधान ख्रिश्चन एनत्से (PM Christian Ntse) यांनी रुग्णालयात (Hospital) दाखल झाले. त्यानंतर त्यांनी चेंगराचेंगरीत ७० हून अधिक लोक जखमी झाले असून त्यापैकी ११ जणांची प्रकृती गंभीर आहे, अशी माहिती दिली. तसेच नागरिकांना शांततेचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. तर या चेंगराचेंगरीचे खरे कारण अद्याप समोर आले नसून मेडागास्करमध्ये इंडियन ओशन आयलँड गेम्स ३ सप्टेंबरपर्यंत होणार आहेत.