मध्य प्रदेशात भीषण अपघात! महाराष्ट्रातील ११ कामगारांचा मृत्यू

मध्य प्रदेशात भीषण अपघात! महाराष्ट्रातील ११ कामगारांचा मृत्यू

बेतुल | Betul

मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) एक भीषण अपघाताची (Accident) घटना घडली आहे. बसने वाहनाला दिलेल्या धडकेत ११ कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे....

बेतूल (Betul) येथे गुरुवारी रात्री हा अपघात झाला आहे. हे सर्व ११ कामगार महाराष्ट्रातील (Maharashtra) होते. या अपघातानंतर (Accident) कारचा चक्काचूर झाला आहे.

मध्य प्रदेशात भीषण अपघात! महाराष्ट्रातील ११ कामगारांचा मृत्यू
Visual Story प्राजक्ताच्या या हटके फोटोशूटने केले घायाळ...

कार बसच्या आतमध्ये घुसली असल्याने इतर मृतदेह काढण्यासाठी तिचा पत्रा कापावा लागला अशी माहिती बेतुल पोलिसांनी दिली आहे.. एका जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मध्य प्रदेशात भीषण अपघात! महाराष्ट्रातील ११ कामगारांचा मृत्यू
Video : धकाधकीच्या जीवनात शांतता पाहिजे? सुरगाण्यातील 'या' ठिकाणी एकदा भेट द्याच

हे कामगार महाराष्ट्रातील अमरावरती (Amravati) येथे निघाले होते. रात्री २ वाजता बसने त्यांच्या एसयुव्हीला धडक दिली. अपघातानंतर सात मृतदेह तात्काळ बाहेर काढण्यात आले. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com