नवी दिल्ली -

देशातील सर्व सरकारी कर्मचार्यांना आता भारत संचार निगम लिमिटेडच्या (बीएसएनएल) काही सेवांवर 10 टक्के सूट

दिली जाणार आहे. यामध्ये ब्रॉडबँड आणि फायबर-टू-द-होम या सेवांचा समावेश आहे. येत्या 1 फेब्रुवारीपासून बीएसएनएलची ही खास योजना कार्यान्वित होणार आहे.

सरकारी नोकरीतून निवृत्त झालेल्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. गतवर्षी सरकारी विभागातील बहुतांश कर्मचार्यांना बीएसएनएलकिंवा एमटीएनएलचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. आपापल्या गरजेनुसार सरकारी कर्मचार्यांनी बीएसएनएलकिंवा एमटीएनएलचे प्लान घ्यावेत, असे सांगण्यात आले होते. बीएसएनएलआणि एमटीएनएल डबघाईला आले असून, अन्य कंपन्यांशी स्पर्धा करणे दोन्ही कंपन्यांसाठी कठीण होत चालले आहे.

दरम्यान, बीएसएनएलकडून ब्रॉडबँड आणि भारत फायबर ग्राहकांसाठी ओटीटी अॅड ऑन पॅकची घोषणा करण्यात आली आहे. यातून इतर खासगी कंपन्यांकडे वाढत चाललेला युझर्सचा कल पुन्हा एकदा बीएसएनएलकडे वळावा, यासाठी हा प्रयत्न केला जात असल्याचे सांगितले जात आहे.