राहत इंदोरी
राहत इंदोरी
देश-विदेश

गझलकार इंदोरी कालवश

‘बुलाती है मगर जाने का नही’ शेर लोकप्रिय

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

इंदूर | Indore -

प्रख्यात गझलकार आणि गीतकार राहत इंदोरी यांचे हृदयविकाराचा झटक्याने निधन झालं आहे. ते 70 वर्षांचे होते. मध्य प्रदेशातील इंदूरमधल्या रुग्णालयात त्यांना रविवारी दाखल करण्यात आलं होतं. Rahat Indori Passed Away Due To Heart Attack

त्यांना करोनाची लागण झाली होती. त्यांना मंगळवारी दोनदा हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती अरविंदो रुग्णालयाचे डॉक्टर विनोद भंडारी यांनी दिली. दरम्यान काही महिन्यांपूर्वी त्यांचा बुलाती है मगर जाने का नहीं हा शेर खूप चर्चेत आला होता. सोशल मीडियावर या शेरनं अक्षरशः धुमाकूळचं घातला होता.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com