Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedनाशिकचे पाणी जायकवाडीच्या दिशेने झेपावले!

नाशिकचे पाणी जायकवाडीच्या दिशेने झेपावले!

औरंगाबाद- Aurangabad

औरंगाबादसह मराठवाड्यासाठी अत्यंत महत्त्वाचे धरण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जायकवाडी पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस सुरू असून धरणसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे. जायकवाडी धरणाच्या (Jayakwadi Dam) उर्ध्व भागातील धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यास सुरुवात झाली आहे. तसेच जायकवाडी धरणाच्या (Jayakwadi Dam) पाणलोट क्षेत्रातही गेल्या तीन चार दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्याने नाले- ओढ्यामध्ये चांगलेच पाणी वाहत आहे. त्यामुळे येत्या २४ तासांत जायकवाडीत सुमारे पाच हजार क्युसेस क्षमतेने पाण्याची आवक होईल, अशी शक्यता सूत्रांनी दिली.

- Advertisement -

धरणात सोमवारी सकाळी आठच्या नोंदीनुसार ३५.२१ टक्के साठा आहे. उर्ध्व भागातील धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या तीन चार दिवसांपासून मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ झाली. त्यानुसार विसर्ग करण्यात आला आहे.

हे पाणी टप्प्याटप्याने जायकवाडी धरणात (Jayakwadi Dam) दाखल होईल. नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरणातून (Gangapur Dam) ३ हजार क्युसेस, दारणातून १ हजा ५००, कडवा प्रकल्पातून ६ हजार ७१२ तर नांदूर मधमेश्वरमधून सोमवारी ४१ हजार ६१३ हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या