मुलीचे शिक्षण, लग्नासाठी बचत करायचीय? बातमी तुमच्यासाठी

मुलीचे शिक्षण, लग्नासाठी बचत करायचीय? बातमी तुमच्यासाठी

नवी दिल्ली | प्रतिनिधी New Delhi

केंद्रातील मोदी सरकारने सुकन्या समृद्धी योजना सुरु केली होती. या योजनेतंर्गत मुलीच्या नावे बँक खाते तयार करण्यात आले आहेत. यामध्ये बँकेत जमा होणाऱ्या पैशांवर कर लागत नाही. आता देशातील आघाडीची सरकारी बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेने (PNB) ग्राहकांना एक खास सुविधा देऊ केली असून त्यानुसार या बँकेत उघडल्या जाणाऱ्या सुकन्या समृद्धी खात्यांसाठी विशेष लाभदेखील दिला जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे...

बँकेकडून देण्यात आलेल्या माहिती तुम्ही कमीतकमी 250 रुपयांचे डिपॉझिट जमा करुन या बँकेत सुकन्या समृद्धी खाते उघडू शकता येणार आहे.

या खात्यात तुम्ही दरवर्षी 1 लाख 50 हजार रुपयांची गुंतवणूक करु शकता. मुलीचे वय दहा वर्षांपेक्षा कमी असले पाहिजे अशी अट मात्र यात आहे. जास्तीत जास्त दोन खाती उघडली जाऊ शकतात. या खात्यांमध्ये जमा होणाऱ्या पैशांवर सेक्‍शन 80C अंतर्गत कोणताही कर लागत नाही.

सुकन्या समृद्धी योजनेतील गुंतवणुकीवर वार्षिक 7.6 टक्के इतके व्याज मिळते. केंद्र सरकार दर तीन महिन्यांनी अल्पबचत योजनांवरील व्याजदराचा फेरआढावा घेते. यामध्ये सुकन्या समृद्धी योजनेचाही समावेश आहे. सध्याच्या घडीला सर्वाधिक व्याजदर मिळणाऱ्या योजनांमध्ये SSY चा समावेश आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com