Nashik Accident News : करंजाळीजवळ बस-कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, एक गंभीर

Nashik Accident News : करंजाळीजवळ बस-कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, एक गंभीर

पेठ | Peth

नाशिक-पेठ-धरमपूर राष्ट्रीय महामार्गावर अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. या महामार्गावर आज करंजाळीजवळ बस आणि कारचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे...

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक-पेठ-धरमपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ८४८ वर करंजाळी जवळील वळणावर पेठ आगाराची पेठ-पुणे बस क्र. एमएच ४० वाय ५९७४ व नाशिकहून गुजरातकडे जाणारी सनी कार क्र. जीजे o६ एफसी ३३३१ यांची दुपारी ४:०० वाजे दरम्यान समोरासमोर धडक झाली.

Nashik Accident News : करंजाळीजवळ बस-कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, एक गंभीर
Asia Cup 2023 : भारत- पाकिस्तान सामन्यात पाऊस आला तरी 'नो टेन्शन'! आयोजकांनी घेतला मोठा निर्णय

या अपघातात कारमधील सुरत येथील प्रवाशांपैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला उपचारासाठी तातडीने नाशिक येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रवाशांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

Nashik Accident News : करंजाळीजवळ बस-कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, एक गंभीर
नाशिकमध्ये धो-धो; गंगापूरमधून विसर्ग वाढवला, 'या' धरणांमधूनही सोडले पाणी
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com