Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedनांदेड- मनमाड ब्रॉडगेजच्या दुहेरीकरणाला मान्यता

नांदेड- मनमाड ब्रॉडगेजच्या दुहेरीकरणाला मान्यता

औरंगाबाद – aurangabad

मागील अनेक वर्षांपासून नांदेड (Nanded Manmad Broadgauge) मनमाड ब्रॉडगेज दुहेरी करण्याची मागणी राजकीय पक्ष व रेल्वे संघटनांकडून (Railway Association) केली जात होती. त्यासाठी अनेकदा आंदोलने देखील झाली. परंतु या मार्गावर मालवाहतूक कमी असल्यामुळे दुहेरी करण्याचा प्रस्ताव नाकारण्यात येत असल्याची चर्चा होत होती. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मराठवाड्यातील (Marathwada) जनतेच्या भावना लक्षात घेऊन याबाबत रेल्वे विभागाचा आढावा घेतला. त्यानंतर अम्ब्रेला योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात अंकाई ते औरंगाबाद दरम्यान 98 किलोमीटरवरील ब्रॉडगेज दुहेरीकरण आला मान्यता मिळवून दिली.

- Advertisement -

अम्ब्रेला योजनेत रुंदीकरण, दुहेरीकरण व अन्य काही कामे करण्यास एकत्रितपणे निधी दिला जातो. योजनेत कोणती कामे समाविष्ट करायची याचे सर्व अधिकार रेल्वे बोर्डाला आहेत. तसेच या कामाची रक्कम एक हजार कोटींपेक्षा कमी असावी अशी अट आहे. नांदेड ते मनमाड ब्रॉडगेज दुहेरीकरण प्रकल्पासाठी एक हजार कोटींपेक्षा अधिक खर्च लागण्याची शक्यता असल्याने त्यासाठी निती आयोग व केंद्रीय मंत्रिमंडळासमोर सादर विषय घ्यावा लागणार होता. म्हणून दानवे यांनी हा विषय निती आयोग व केंद्रीय मंत्रिमंडळासमोर न जाऊ देता पहिल्या टप्प्यात योजनेअंतर्गत 98 किलोमीटरच्या कामाला रेल्वे बोर्डाकडून मान्यता मिळवून घेतली. याव्यतिरीक्त शिल्लक असलेल्या मार्ग दुसऱ्या टप्प्यात अम्ब्रेला योजनेअंतर्गत घेऊन पूर्ण करण्याचे नियोजनही करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या