'नागरिक मित्र पथका'ने केले मालामाल

तिजोरीत चार कोटी
'नागरिक मित्र पथका'ने केले मालामाल

औरंगाबाद - aurangabad

महापालिकेच्या (Municipality) नागरिक मित्र पथकाने चार वर्षात दंडाच्या स्वरूपात तीन कोटी ९९ लाख रुपयांचा महसूल पालिकेला मिळवून दिला आहे. या दरम्यान पथकाने ५९ हजार नागरिकांना विविध कारणांसाठी दंड ठोठावला आहे.

महानगरपालिकेच्या नागरिक मित्र पथकाने कोरोना काळात मास्क न वापरणाऱ्या २८ हजार ४०८ नागरिकांवर दंडात्मक कारवाई करत एक कोटी ४२ लाख चार हजारांचा दंड वसूल केला आहे. तर प्रतिबंधित प्लास्टिक वापरणऱ्यांवर कारवाई करत ४३ हजार १९५ किलो प्लास्टिक जप्त करून एक कोटी ५३ लाख ७० हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला. याशिवाय नागरिक मित्रपथकाने चार वर्षात दंडाच्या स्वरूपात तीन कोटी ९९ लाख रुपयांचा महसूल पालिकेला मिळवून दिला आहे. या दरम्यान पथकाने ५९ हजार नागरिकांना विविध कारणांसाठी दंड ठोठावला आहे.

रस्त्यावर थुंकणे, रस्त्यावर कचरा टाकणे, बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकणे, कचरा जाळणे अशा विविध उपद्रवी बाबींवर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेने माजी सैनिकांच्या मदतीने “नागरिक मित्र' पथक तयार केले आहे. या मित्र पथकावर प्रतिबंधित प्लास्टिक वापरावर कारवाई करण्याची जबाबदारी दिली आहे. कोरोना काळात मास्क न वापरणार्‍या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्याचे काम नागरिक मित्र पथकाला देण्यात आले होते. या सर्व कामांच्या माध्यमातून पथकाने ५९ हजार नागरिकांवर दंडात्मक कारवाई करत तीन कोटी ९९ लाख रुपये वसूल केले. घनकचरा व्यवस्थापन विभागाअंतर्गत नागरिक पथक काम करत असून, या पथकाचे प्रमुख म्हणून प्रमोद जाधव यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. नागरिक मित्रपथकाने मास्क न वापरणाऱ्या २८ हजार ४०८ नागरिकांवर दंडात्मक कारवाई करत त्यांच्याकडून एक कोटी ४२ लाख चार हजारांचा दंड वसूल केला आहे.

नागरिक मित्र पथकाने मास्क न वापरणाऱ्या २८४०८ नागरिकांवर दंडात्मक कारवाई करीत एक कोटी ४२ लाख चार हजार रुपयांचा दंड वसुल केले. प्रतिंबधित प्लास्टिक वापरणाऱ्यांवर कारवाई करून ४३१९५ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आणि एक कोटी ५३ लाख ७० हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. रस्त्यावर थुंकणे, कचरा जाळणे या घटनांच्या २०३१६ केसेस करण्यात आल्या आणि ७५ लाख २४ हजार ५०० रुपये दंड वसुल करण्यात आला. रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकण्याच्या प्रकाराच्या १०१९ केस करण्यात आल्या आणि १६ लाख ८१ हजार रुपये वसूल करण्यात आले. वैद्यकीय कचरा रस्त्यावर टाकल्या प्रकरणी २८५ प्रकरणात सात लाख ७६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्याशिवाय नायलॉन मांजा वापरणे, क्लासेसचे पोस्टर लावणे, पाण्याची नासाडी करणे या प्रकरणांमध्ये देखील दंड वसूल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com