पारावरच्या गप्पा ! कोरोना : काळजी करू नका, पण काळजी घ्या….
आवर्जून वाचाच

पारावरच्या गप्पा ! कोरोना : काळजी करू नका, पण काळजी घ्या….

Gokul Pawar

Gokul Pawar

(संत्या, विक्या, यश्या, वैभ्या, भग्या, विज्या अन समदी शहाणी मंडळी बसलेली )

संत्या : काय वैभ्या, शेवटी गावचीआठवण आली वाटतं, काय यश्या?
वैभ्या : हो यर आलो गावाकडं..
यश्या : हं, चांगला पंधरा वीस दिवस राहणार आहेत.
भग्या : मग भारीच कि तेवढंच क्रिकेट खेळायला कोणी नसत…
वैभ्या :नाही, भो घरी आलो म्हणजे अभ्यास थोडीच सोडायचा हाये..
विज्या : म्हणजे घरी आलं तरी मित्रांना वेळ द्यायचा नाही तर …

यश्या : नाहीरे आताच ऍड पडलीय, चांगला अभ्यास चालू व्हता.. मधीच हे असं झालं.
संत्या : काय रे काय झालं..?
वैभ्या : कोरोना व्हायरस रे, त्याच्यामुळं त घरी आलो..
विक्या : तरीच म्हटलं, तुम्ही घरी न येणारे घरी कसे आले ते..

विज्या : जाऊद्या मित्रांनो , आपलेच मित्र आहेत. ते.. त्या कोरोना व्हायरसने का होईना आपले मित्र गावाकडं आले…
भग्या : कारे, मी त ऐकलं लय डेंजर व्हायरस हाय म्हणे… आतापर्यंत आपल्या देशांत बी अनेकांना घेऊन गेलाय म्हण …
वैभ्या : हो ना यार, कालपासून तर सगळंच बंद केलंय सरकारन.. बरं झालं गावाकडं अजून काही नाही…
विक्या : हो, पण आपल्याकडं येणार नाही हे कशावरून…
यश्या : येऊ शकतो, पण घाबरायचं काही कारण नाही पण काळजी घेतली पाहिजे…
संत्या : हो ना, टीव्हीवर नुसते गो करोना, गो करोना चालू हाये..

वैभ्या : होणं लोकांना गांभीर्य च नाही… अजून काही लोकांना याबद्दल माहिती देखील नाही…
विज्या : एक काम करूया आपण मंदिरात समद्यांना बोलवून हि माहिती सांगूया…
भग्या : हो तुम्ही दोघे सांगा… (सगळे मंदिराकडे जातात. या ठिकाणी ग्रामस्थ बसलेले आहेत.)

तुळश्या : या आजाराची काय काय लक्षणे आहेत?
वैभ्या : सर्वात पहिले याची लक्षणे ताप, थकवा आणि कोरडा खोकला अशी आहेत. म्हणजे सुरवातीला ही लक्षणे साधारण असतात आणि हळूहळू सुरू होतात.
दाम्या : हा आजार कसा पसरतो, यावर काही औषध आहे का?
यश्या : हा व्हायरस संसर्गजन्य आहे, यावर अजून औषध नसले तरी योग्य काळजी घेतली तर यापासून बचाव करता येतो…
तुक्या : म्हणजे नक्की काय करायचं ?

वैभ्या : जर आपल्या आजूबाजूला आजारी लोक असतील तर त्यांच्यापासून कमीतकमी ३ फूट अंतरावर उभं राहायचं, हातात हात घेण्यासापेक्षा लांबून नमस्कार करावा…
यश्या : अन महत्वाचं.. दर मिनिटाला आपले हात धुवायचे ..जेणेकरून स्वच्छता पाळली कि संसर्ग होणार नाही..
दाम्या : म्हणजे, घाबरायचं काही कारण नाही…
वैभ्या : हो, काळजी करायचं काही कारण नाही, पण काळजी घ्या…
(समदेजण व्हय व्हय म्हणून घराकडे जातात.)

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com