‘योगासनं’ निरोगी शरीराचा रामबाण उपाय
आवर्जून वाचाच

‘योगासनं’ निरोगी शरीराचा रामबाण उपाय

Dinesh Sonawane

नाशिक | दिपाली गडवजे

प्रत्येक व्यक्ती जीवनाचे ध्येय ठरवत असतो, ते ध्येय गाठण्यासाठी तो नेहमीच धडपडतही असतो. आपल्या जीवनरुपी प्रवासात ध्येयपूर्ती करण्यासाठी तो अडथळ्यांचा सामना करत असतो.

शारीरिक अस्वस्थता, मानसिक ताणतणाव, आळस, निष्काळजीपणा या सारखे अडथळे आपल्या आयुष्यात येतात व ते आपल्याला आपल्या ध्येयापासून दूर नेतात. त्यामुळे दैनंदिन जीवनात आनंदी,उत्साही, निरोगी राहायचे असेल तर योग करणे अत्यंत आवश्यक आहे. असे योग अभ्यासक सांगतात.

केवळ शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्यासाठी योगाचे खूप महत्व आहे. इतकेच नव्हे तर पाश्चात्य देशांनी देखील योगाला खूप महत्त्वाचे स्थान दिले आहे.

योगाचे अनेक प्रकार आहेत. आरोग्य आणि तंदुरुस्तीसाठी दररोज योग केला पाहिजे. आज दिवसेंदिवस वाढते शहरीकरण सोबतच वाढते प्रदूषण त्यामुळे अनेक आजार निर्माण होत आहेत.

यावर मात करण्यासाठी रोज नित्यनेमाने योगा केला पाहिजे. सद्या मोठ्या प्रमाणात बैठी कामे केली जातात या जीवनशैलीमुळे येणाऱ्या सुस्तपनावर मात करण्यासाठी योग हा उत्तम पर्याय आहे.

जगातील हा एकमेव व्यायाम प्रकार आहे त्यामुळे खुप सारे फायदे आपल्याला होत असता. दररोज योगा केल्याने आपले वय देखील लपते व आपण नेहमी तरुण दिसतो.

एखाद्या व्यसनापासून सुटका मिळवायची असेल ,किंवा रागावर ताबा मिळवायचा असेल तर योग हा उत्तम उपाय आहे. योग तुम्हाला खंबीर आणि सकारात्मक बनवतो.काही लोक तर योगाला जीवन जगण्याचे साधन म्हणून देखील बघता.

योगाचे विविध फायदे

वजनात घट

सशक्त आणि तंदुरुस्त शरीर

तजेलदार त्वचा

नातेसंबंधात सुधारणा

ऊर्जा शक्ती वाढते

सजगतेत वाढ होते

शांतता, प्रसन्न मन आणि उत्तम आरोग्य लाभते.

Deshdoot
www.deshdoot.com