Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedभरदिवसा गळा चिरून तरुणीची हत्या

भरदिवसा गळा चिरून तरुणीची हत्या

औरंगाबाद – aurangabad

शहरातील देवगिरी महाविद्यालयात (Devagiri College) शिकणाऱ्या एका १९ वर्षीय विद्यार्थिनीला अक्षरश: दोनशे फुट फरफटत नेत मित्रानेच धारदार हत्याराने भरदिवसा गळा चिरून तिची हत्या (Murder) केली. रचनाकार कॉलनी भागात शनिवार घडलेल्या या विदारक घटनेमुळे औरंगाबादमध्ये एकच खळबळ उडाली आहे. शिक्षण क्षेत्रात (Field of education) या प्रकारानंतर काळजीचे वातावरण पसरले आहे.

- Advertisement -

एकतर्फी प्रेमातून ही हत्या झाली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ग्रंथी सुखप्रीत कौर प्रीतपाल सिंग (वय-१९, रा.उस्मानपुरा, औरंगाबाद) असे हत्या झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. तर शरण सिंह सेठी (वय-२०, रा.उस्मानपुरा) असे फरार आरोपीचे नाव आहे. मृत ग्रंथी आणि संतोष हे अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. ग्रंथी ही देवगिरी महाविद्यालयात बीबीएच्या प्रथम वर्षात शिकत होती. दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास ग्रंथी,तिची मैत्रीण आणि शरण सिंह असे तिघेही महाविद्यालयाजवळ बॅक्रे इमोजी या हॉटेलमध्ये गेले. हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर शरण सिंह आणि ग्रंथी दोघेही बसलेले होते. तर तिची मैत्रीण खालच्या टेबलवर बसली होती. ग्रंथीने कोल्ड कॉफी ऑर्डर केली. दरम्यान दोघांमध्ये वाद सुरू झाले. ग्रंथी ऑर्डर केलेली कॉपी न पिताच कॅफेच्या बाहेर पडली. त्या मागोमाग शरणसिंह व मैत्रीण बाहेर आले.

मदतीसाठी दरवाजे ठोठावले

मैत्रिणीच्या डोळ्यादेखत शरण सिंहने ग्रंथीचा गळा चिरला. रक्ताच्या थारोळ्यात ग्रंथी जमिनीवर पडलेली होती. जिवलग मैत्रिणीला वाचविण्यासाठी सोबत असलेली तरुणी जोरजोरात ओरडत होती. परिसरातील घरांचे दरवाजे वाजवत होती. मात्र, तिच्या मदतीसाठी कुणीही पुढे आले नाही. वेळीच मदत मिळाली असती तर कदाचित आज ग्रंथीचा जीव वाचला असता अशी चर्चा परिसरात सुरू होती.

आरोपी रेल्वेने पळाल्याचा संशय

सुखप्रीतसिंगवर शरणसिंगने तब्बल १७ वार केले. गळ्याच्या डाव्या बाजूने पाच, उजव्या बाजूने नऊ वेळा कृपाण खुपसले. त्यानंतर त्याच गळ्याला पकडून पोटात तीन वेळेस वार केले. टोकाच्या संतापात केलेले वार इतके खोल व गंभीर होते की गळ्याच्या दोन्ही बाजूंनी अक्षरश: सुपारी एवढ्या आकाराचे छिद्र पडले. दिव्याच्या समोर हा प्रकार घडत होता. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुखप्रीतसिंगकडे पाहून तू गेलीस, आता मीही तुझ्या मागे येतोय’, असे म्हणत शरण सिंगने शस्त्रासह तेथून पोबारा केला. रेल्वेस्थानकाच्या दिशेने गेल्याचे सांगितले जाते. तो रेल्वेने पळून गेल्याचा प्राथमिक संशय आहे. वेदांतनगर पोलिसांचे पथक, गुन्हे शाखेची दोन पथके त्याचा शोध घेत आहेत. रेल्वेस्थानकावरच त्याने मोबाईल बंद केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या