अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या चुलत भावाचा खून 

आरोपी भाऊ व पत्नी गजाआड 
अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या चुलत भावाचा खून 

औरंगाबाद- Aurangabad

पैठण तालुक्यातील बालानगर येथे एका शेतात पुरून ठेवलेल्या मानवी सांगड्याच्या प्रकरणाचा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने चोवीस तासांत छडा लावला. अनैतिक संबंधास अडचण ठरत असल्याने पत्नी व चुलत भावाने मिळून हा खून केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी आरोपी पत्नी व चुलत भावाला अटक केली आहे.

बालानगर येथील राधाबाई धोंगडे यांच्या शेतामध्ये गुरुवारी रघुनाथ घोंडगडे याचा सांगाडा पुरलेल्या अवस्थेत आढळला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने तपास केला असता, त्याची पत्नी यशोदा घोंगडे व दत्तात्रेय उर्फ शिवाजी जगन्नाथ घोंगडे यांनी मिळून हा खून केल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्या दोघांमध्ये अनैतिक संबंध होते.

त्यात अडसर येत असल्यामुळे जानेवारीच्या सुरुवातीला दोघांनी दगडाने व काठ्याने मारहाण करून त्याचा खून केला व मृतदेह राधाबाई घोंगडे याच्या शेतात पुरला, अशी कबुली दत्तात्रेयने दिली. पोलीस अधिक्षका मोक्षदा पाटील व उपविभागीय पोलिस अधिकारी गोरख भामरे याच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक भागवत फुंदे, फौजदार संदीप शेळके, प्रमोद खांदेभराड, किरण गोरे यांनी हा तपास केला.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com