क्रूरतेचा कळस; 'आँखे निकाल के गोटीया खेलूंगा'ला खरं केलं

क्रूरतेचा कळस; 'आँखे निकाल के गोटीया खेलूंगा'ला खरं केलं

औरंगाबाद | Aurangabad

जुन्या जमान्यातील सिनेमात 'मै वो हूं जो, आँखे निकाल के गोटीया खेलूंगा' असे डायलॉग व्हिलन म्हणताना दिसत होता. पण औरंगाबादमध्ये (murder in aurangabad maharashtra) एका व्यक्तीची हत्या करून त्या मयताचे डोळे काढून चक्क रस्त्यावर त्या डोळ्यांच्या गोट्या खेळल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकाराने सर्वत्र खळबळ उडाली आहे. फरार आरोपीला लोणावळ्यात पोलिसांनी अटक (Lonavla police station) केल्याचे समजते.... 

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत अबू बकर आणि आरोपी सय्यद हे दोघेही रात्री दोघांनी दीडपर्यंत आंबेडकरनगर (Ambedkar nagar area) परिसरातील झोपडपट्टी भागात बसून मद्यप्राशन करत होते. त्यावेळी समीरचा मोबाइल अबु बकरच्या ताब्यात होता. दरम्यान समीरच्या आईचे सतत फोन येत असतांना देखील अबू बकर त्याला 'मै बोलूंगा तभीच कॉल लेने का' असे सांगत होता.

समीर वारंवार अबूकडे मोबाईल मागत होता, मात्र अबू बकरने न ऐकल्याने समीरचा राग अनावर झाला, याच रागातून त्याने अबू बकरवर तब्बल १०० वार केले.

नंतर अबू बकरचे डोळे काढून चक्क रस्त्यावर गोट्या खेळलो, अशी कबुलीही त्याने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

जिन्सी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे (PI vyanktesh kendre Gincy police station) यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय गोकुळ ठाकूर यांनी आरोपी सय्यद समीरला ताब्यात घेतले. त्याने या गुन्ह्याची कबुली दिली. त्याला एमआयडीसी सिडको पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास पोलिस उप निरीक्षक संजय मांटे करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com