Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedमनपाने बुजवले 15 हजार खड्डे; आयुक्तांसह शहर अभियंत्यांची कामांवर बारीक नजर

मनपाने बुजवले 15 हजार खड्डे; आयुक्तांसह शहर अभियंत्यांची कामांवर बारीक नजर

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

मागील दीड महिन्यापासून सुरू असलेल्या पावसाने (monsoon) मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतल्यामुळे महापालिका प्रशासनाने (Municipal administration) त्वरित खड्डे (potholes) बुजवण्याच्या कामाला गती दिली आहे. तसेच अनेक ठिकाणी डांबरीकरण देखील सुरू झाली आहे.

- Advertisement -

अवघ्या दोन दिवसांमध्ये घेऊन ठेवलेल्या गणेशोत्सव (Ganeshotsav) सणाच्या पूर्वी शहरातील सर्व रस्ते चकाचक करण्यासाठी महापालिकेने आतापर्यंत सुमारे 15 हजार खड्डे बुजवल्याच्या दावा केला आहे. महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (Municipal Commissioner Dr. Chandrakant Pulkundwar) व शहर अभियंता शिवकुमार वंजारी (City Engineer Shivkumar Vanjari) जातीने कामावर लक्ष ठेवू आहे.

रस्ता तयार करून देणार्‍या ठेकेदाराकडे (Contractor) पुढील तीन वर्षे त्याची देखभालीची जबाबदारी असते, अशा सुमारे 45 रस्त्यांवर यंदा मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. ते खड्डे संबंधित ठेकेदाराकडून बुजवून घेण्यात येत आहे.

पावसामुळे शहरातील रस्त्यांची चाळण झाली होती. त्यामुळे मार्गक्रमण करताना वाहनचालकांचे मणके ढिले होत आहे. आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी हा प्रश्न गंभीरतेने घेत बांधकाम विभाग (Construction Department) व ठेकेदारांची खरडपट्टी काढत गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांवरील खड्डे (potholes) बुजवा असा अल्टिमेटम (Ultimatum) दिला. तसेच पावसाचा जोर ओसरल्यानंतर डांबर खडी टाकत खड्डे बुजवा, अशा सूचना दिल्या होत्या. तसेच स्वत: ऑनफिल्ड उतरत रस्त्यांची पाहणी केली. त्यानंतर बांधकाम विभागाकडून खड्डे बुजविण्याच्या मोहिमेने गती घेतली आहे.

दोन दिवस पावसाने उघडीप घेतली असून सूर्य दर्शनामुळे खड्डे पेव्हर ब्लॉक व मुरुमाऐवजी डांबर आणी खडी टाकून बुजविण्यात येत आहे. गणपती मिरवणूक मार्गावर विशेष लक्ष देत तेथील खड्डे बुजविण्यास प्राधान्य दिले जात आहे. आतापर्यंत पंधरा हजार खड्डे बुजविण्यात आले आहे. खड्डे बुजविण्याच्या मोहिमेचा रोज आढावा घेतला जात असून आयुक्तांना माहिती दिली जात आहे. नागरिकांना त्रास होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. अनेक ठिकाणी डांबरीकरण कामाला देखील सुरुवात झाली आहे.

– शिवकुमार वंजारी, शहर अभियंता, मनपा

- Advertisment -

ताज्या बातम्या