Video : मुंबई पोलिसांचे ‘श्रीवल्ली’ गाणे होतेय सर्वत्र व्हायरल; पाहण्यासाठी इथे क्लिक करा

jalgaon-digital
2 Min Read

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

पुष्पा चित्रपट (pushpa movie) आणि त्या चित्रपटातील विशेष गाण्यांनी (songs) सर्वांच्याच मनावर अधिराज्य गाजवलेलं आपण बघितले आहे. मराठी पासून अनेक व्हर्जन (Version) या चित्रपटातील श्रीवल्ली (Shrivalli) या गाण्यावर झाले.

आता मुंबई पोलिसांच्या या श्रीवल्ली व्हर्जनची (shrivalli mumbai police version) सर्वत्र चर्चा आहे. चित्रपट रिलीज होऊन अनेक दिवस लोटले गेले आहेत, मात्र या चित्रपटातील डायलॉग्ज आणि गाण्यांनी अजुनही अनेकांना भुरळ घातलेली दिसून येत आहे.

मुंबई पोलिसांच्या बँड खाकी स्टुडिओने (mumbai police band khaki police) अलीकडेच या चित्रपटातील सुपर डुपरहिट श्रीवल्ली गाणे तयार केले आहे. या गाण्याचा सध्या व्हिडीओ सोशल मीडियात कमालीचा व्हायरल झाला असू मुंबई पोलिसांचे श्रीवल्ली पहिले का? असे अनेकजन एकमेकांना भेटल्यावर विचारू लागले आहेत.

सॅक्सोफोन (Saxophone), ट्रम्पेट (Trumpet), बासरी (Basari) आणि इतर वाद्यांसह खाकी स्टुडिओचे सदस्य ‘श्रीवल्ली’ हे गाणे वाजवताना दिसतात. ‘श्रीवल्ली’चे हे अनोखे व्हर्जन शेअर करत मुंबई पोलिस म्हणतात की,

‘खाकी स्टूडियो रुकेगा नहीं! (khaki studio rukega nahi) ‘श्रीवल्ली’च्या सुरावर आम्ही मुंबईकरांना डोलताना पाहिले आणि त्यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला!

मुंबई पोलिसांच्या (mumbai police) ट्विटर आणि युट्युब चॅनलवर (you tube channel) हा व्हिडीओ शेअर (Video shared) करण्यात आला आहे. श्रीवल्ली (Shrivalli) असे कॅप्शन खाकी स्टुडिओने (khaki studio) दिले आहे. ट्विटरवर लाईक आणि रीट्विट करत अनेकांनी मुंबई पोलिसांना (mumbai police) सलाम केला आहे. हजारो लाईक आणि कमेंट्स या अनोख्या गाण्याला मिळाले असून मुंबईकर सध्या पोलिसांनी सादर केलेल्या या गाण्याच्या प्रेमात पडलेले दिसून येत आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *