लवकरच मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वे!

प्रशासनाने नागरिकांशी साधला संवाद
लवकरच मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वे!

औरंगाबाद - Aurangabad

पर्यावरण संवर्धन, सामाजिक परिणाम, भूसंपादन प्रक्रिया, रेल्वेचा थांबा (Train stop), मिळणारा मावेजा आदी विषयांवर मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वे (Mumbai-Nagpur High Speed ​​Railway) (एमएनएचएसआर) प्रकल्पाच्या पर्यावरण आणि सामाजिक परिणामाच्या मुल्यांकणासाठी रेल्वे अधिकारी (Railway Officer), जिल्हा प्रशासन (District Administration) आणि नागरिकांत चर्चा झाली.

एमजीएम विद्यापीठाच्या (MGM University) रुक्मिणी सभागृहात मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या पर्यावरण आणि सामाजिक परिणामाच्या मुल्यांकणासाठी सल्लामसलत झाली. यावेळी रेल्वेचे सह सरव्यवस्थापक अनिल शर्मा (Anil Sharma), अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, उपजिल्हाधिकारी मोरे, प्राजक्ता कुलकर्णी, प्रदीप बर्गे, विशाल श्रीवास्तव, राहुल रंजन आदींची उपस्थिती होती.

नॅशनल हायस्पीड रेल्वे कार्पोरेशन लिमिटेडच्या वतीने मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वे प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार करण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत पर्यावरण, सामाजिक परिणामासह नागरिक, शेतकऱ्यांचे विचार शर्मा आणि अप्पर जिल्हाधिकारी डॉ.गव्हाणे यांनी समजून घेत त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी आनंद बोरकर, विश्वनाथ कदम, करमाडचे सरपंच कैलास उकर्डे, टाकळीचे शिवाजी चंदेल आदींनी विविध उपाय सांगत सूचना केल्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com