महाराष्ट्र पोलिसांची मुंबई ते दिल्ली सायकल राईड; धुळ्यातील सर्वाधिक पोलीस

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
महाराष्ट्र पोलिसांची मुंबई ते दिल्ली सायकल राईड; धुळ्यातील सर्वाधिक पोलीस

नाशिक | प्रतिनिधी Nashik

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त" (Azadi Ka Amrit Mahotsav) महाराष्ट्र पोलिसांकडून (Maharashtra Police) पोलीस महासंचालक कार्यालय मुंबई ते दिल्ली (लाल किल्ला) (Mumbai to Delhi Cycle ride) अशी सायकल रॅली आयोजित करण्यात आली आहे. या सायकल रॅलीमध्ये महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग घेतला आहे. या रॅलीला मंगळवार (दि ०२) पासून सुरूवात झाली आहे. मुंबई ते दिल्ली अशी सायकल रॅली पार पडणार आहे....

आज (दि 03) ही सायकल रॅलीचे (Cycle Rally) नाशिक ग्रामीण जिल्हा हद्दीतील इगतपुरी (Igatpuri) परिसरात आगमन झाले. यावेळी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील (SP Sachin Patil) यांनी सायकल रॅलीमधील सहभागी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे पुष्पगुच्छ देवुन स्वागत केले. नाशिक ग्रामीण जिल्हा हद्दीतील मुंबई आग्रा महामार्गावरून (Mumbai Agra highway) इगतपुरी ते मालेगाव तालुका हद्दीतुन सदर सायकल रॅली ही प्रस्थान करणार आहे.

सहभागी सायकलीस्टना रॅली दरम्यान वाहतुकीचा कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याकरीता नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस दलातर्फे पायलटिंग व ट्रॅफिकचे व्यवस्थापन करण्यात आले.

या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग

प्रशांत बच्छाव (अपर पोलीस अधीक्षक धुळे), धनंजय येरूळे (अपर पोलीस उपआयुक्त, रागवि, मुंबई), शरद पाटील (सहा. पोलीस निरीक्षक, गडचिरोली), दिलीप खोंडे (सहा. पोलीस उपनिरीक्षक, धुळे) अनिल जाधव (सेवा निवृत्त सहा. पोउनि, धुळे), जितेंद्र परदेशी (पोहवा, धुळे), प्रकाश माळी (पोहवा, धुळे), शिवाजी हाबळे (पोहवा. पुणे शहर) मनोज भंडारी (पोकॉ, पुणे शहर), सिध्दार्थ जाधव, जावेद शेख, भारत देवरे, निखिल बडगुजर (धुळे जिल्हा पोलीस ) असे एकुण 03 पोलीस अधिकारी व 10 पोलीस कर्मचारी यांनी सहभाग घेतला आहे.

नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी या सायकल रॅली मधील सहभागी अधिकारी व कर्मचारी यांना त्यांचे पुढील मार्गक्रमणासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच पोलीस खेळाडु उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com