विकृत बाप जेरबंद ; स्वतःच्या मुलीवर तब्बल अकरा वर्षे अत्याचार!
औरंगाबाद - aurangabad
जिल्ह्यात एका खेड्यात एका विकृत बापानेच स्वत:च्या मुलीवर (Daughter) अकरा वर्षे अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अजानतेपणाच्या वयात सुरू झालेला अत्याचार वय वाढल्यानंतरही कमी होत नसल्याचे लक्षात आल्यावर तिने घरच सोडण्याचा निर्णय घेतला. ती पळून गेल्यानंतर अल्पवयीन असल्याने (Mukundwadi Police) मुकुंदवाडी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तिचा शोध घेत घडलेल्या प्रकाराविषयी सविस्तर माहिती घेतली.
पुंडलिकनगर पोलिसांना हा प्रकार कळताच त्यांनी तात्काळ ४० वर्षीय नराधम बापाला अटक केली. १७ वर्षीय पूजा (नाव बदलले आहे) आई, लहान भाऊ व आईसह राहते. सध्या बारावीचे शिक्षण घेतलेल्या राणीला शिक्षणाची आवड आहे. त्यामुळे घरची परिस्थिती बेताची असली तरी दहावीनंतर एका महाविद्यालयात प्रवेश घेतला. बारावीनंतर उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळावा यासाठी ट्यूशन लावली. ती रोज मुकुंदवाडी परिसरात ट्यूशनला जात असत. २६ मे रोजी शिकवणीला गेलेली ती मात्र घरी परतलीच नाही. त्यामुळे घाबरलेल्या आईने मुकुंदवाडी पोलिसांकडे तक्रार केली.
निरीक्षक ब्रह्मा गिरी यांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपासासाठी पथके रवाना केले. पोलिसांना अंबाजोगाईत पूजा सापडली. तिला ठाण्यात आणल्यानंतर पोलिसांनी जवाब नोंदवणे सुरू केले. महिला अधिकाऱ्यांना त्या मुलीकडून सत्य जाणून घेण्यास सांगितले. त्यानंतर महिला अधिकाऱ्यांनी पळून जाण्याचे कारण विचारून संवाद साधला तेव्हा तिने सर्व आपबिती सांगितली.