Friday, April 26, 2024
HomeUncategorizedमराठा आरक्षणाला धक्का लागल्यास राज्य सरकार जबाबदार - संभाजीराजे

मराठा आरक्षणाला धक्का लागल्यास राज्य सरकार जबाबदार – संभाजीराजे

पुणे | प्रतिनिधी

मराठा समाजासाठी राज्य शासनाने ईडब्ल्यूएसचा लाभ देण्याचा निर्णय घेतला. मात्र, यामुळे मराठा समाजाच्या आऱक्षणाला फटका बसण्याची शक्यता खासदार संभाजीराजे यांनी वर्तवली आहे.

- Advertisement -

जर आर्थिक मागास वर्गाच्या सवलतीमुळे मराठा आरक्षणाला धक्का लागल्यास त्याला पूर्णपणे राज्य सरकार असेल असे त्यांनी आज सांगितले.

ते आज पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, खुल्या प्रवर्गातून ज्यांना आरक्षण मिळत नाही त्यांच्यासाठी ईडब्ल्यूएस सवलत देण्यात आली आहे. राज्यात मराठा समाजाला एसईबीसी प्रवर्ग तयार केल्याने त्यांना ही सवलत मिळत नव्हती.

पण केंद्रीय आरक्षणानुसार मराठा समाजाला हे १० टक्के आरक्षण मिळत होत. यामध्ये इतरही अनेक समाजांचा समावेश आहे. त्यामुळे हे केवळ मराठा समाजासाठीच दिले असे म्हणता येणार नाही असे ते म्हणाले.

२५ जानेवारीला मराठा आरक्षणावर सुनावणी होणार आहे. या सुनावणीदरम्यान सरकार नक्की काय करेल याबाबत मलाच प्रश्नचिन्ह वाटत असल्ययाचे ते म्हणाले. सरकार हतबल झाल्याचीच मला आता शंका वाटते. त्यामुळे पुढील सुनावणीची तयारी करण्याऐवजी सरकार ही पळवाट काढत असल्याची टीका संभाजीराजे यांनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या