आईने स्वत:ची किडनी देऊन मुलाला दिला पुनर्जन्म!

कमलनयन बजाज रुग्णालयात दुर्मिळ शस्त्रक्रिया
आईने स्वत:ची किडनी देऊन मुलाला दिला पुनर्जन्म!

औरंगाबाद - aurangabad

अवघ्या दहा वर्षाच्या मुलाला किडनीच्या आजाराने ग्रासले असताना जन्मदाती आईने आपली किडनी (Kidney) देत त्या मुलाला पुनर्जन्म मिळवून दिला. दुर्मिळ अशी ही शस्त्रक्रिया (Surgery) कमलनयन बजाज रुग्णालयात (Kamalanayan Bajaj Hospital) पार पडली. लहान बालकामध्ये किडनी प्रत्यारोपण आणि त्यानंतरचे प्रदीर्घ चालणारे उपचार आता औरंगाबादमधील कमलनयन बजाज रुग्णालयात एकाच छताखाली उपलब्ध आहेत.

कमलनयन बजाज रुग्णालयात किडनी विकार व प्रत्यारोपण तज्ञ डॉ. समीर महाजन, बाल किडनी विकार व प्रत्यारोपण तज्ञ डॉ. पंकज भंसाळी, किडनी प्रत्यारोपण सर्जन डॉ. शरद सोमाणी व डॉ. आदित्य येळीकर, भूलतज्ञ डॉ. सचिन नाचने व टीम यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी किडनी प्रत्यारोपण झाले असून बालकाची प्रकृती उत्तम आहे. शिवाय  बालकाला रुग्णालयातुन सुटीदेखील मिळाली आहे. या दरम्यान मेडिकल डायरेक्टर डॉ. मिलिंद वैष्णव व बालरोग विभागप्रमुख डॉ. निखिल  पाठक यांचे मार्गदर्शन लाभले.

किडनीचे आजार क्लिष्ट असले तरी तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार मिळाल्यास बाळाचे आयुष्य प्रदीर्घ आणि सुखकर राहू शकते, असे बाल किडनी विकार व प्रत्यारोपण तज्ञ  डॉ. पंकज भंसाळी यांनी नमूद केले. 

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com