जन्मदात्या आईनेच केला चार वर्षीय मुलीचा खून
अन्य

जन्मदात्या आईनेच केला चार वर्षीय मुलीचा खून

आईला पोलिसांनी घेतले ताब्यात

Rajendra Patil Pune

पुणे|प्रतिनिधी|Pune

त्रास देते या कारणावरून जन्मदात्या आईनेच चार वर्षीय मुलीचा गळा आवळून तिचा खून केल्याची हृदयद्रावक घटना पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवीत घडली आहे. सोमवार सकाळी ११ वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी मृत मुलीच्या आईला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार वर्षीय चिमुकलीचा आईने खून केल्याची घटना पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवीत घडली आहे. या प्रकरणी मृत मुलीच्या आईला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या महिलेच्या सासूचा मृत्यू झालेला असल्याने त्यांचा दशक्रिया विधीसाठी या महिलेचे कुटुंबीय आज बाहेरगावी गेले होते.

दरम्यान घरात सहा महिन्यांचा मुलगा व चार वर्षांची चिमुकली होती. सकाळी ही मुलगी त्रास देत असल्याने आईने तिचा खून केला. या मुलीचं डोकं भिंतीवर आदळलं असण्याची शक्यता असून, तिच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराचे व्रण देखील आहेत.

दरम्यान, आरोपी महिलेचे मानसिक संतुलन ठीक नसल्याचेही सांगण्यात येत आहे. घटनेचा अधिक तपास सांगवी पोलीस करत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com