मूळ घरावर आणखी मजले बांधता येणार ; टीडीआरचा मिळणार लाभ

मूळ घरावर आणखी मजले बांधता येणार ; टीडीआरचा मिळणार लाभ

औरंगाबाद - aurangabad

शहरातील सिडको (CIDCO) भागाचे औरंगाबाद महापालिकेकडे (Municipality) हस्तांतरण झाल्यापासून या भागातील मालमत्तांना टीडीआरचा (tdr) लाभ मिळत नव्हता. मात्र आता महापालिकेने मालमत्तांवर टीडीआरला परवानगी दिली आहे. त्यामुळे सिडको भागातील मालसमत्तांना आता टीडीआरचा लाभ घेता येणार आहे, अशी माहिती प्रशासक (administrator) डॉ.अभिजीत चौधरी यांनी दिली. पालिकेच्या या निर्णयामुळे आता सिडको भागात बहुमजली इमारती थाटण्याचे नागरिकांचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

मूळ घरावर आणखी मजले बांधता येणार ; टीडीआरचा मिळणार लाभ
राहुल गांधी वारकऱ्यांसोबत खेळणार पाऊली!
मूळ घरावर आणखी मजले बांधता येणार ; टीडीआरचा मिळणार लाभ
Visual Story इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेली बॉलिवूड अभिनेत्री

औरंगाबाद शहरात आजवर विकास हक्क प्रमाणपत्र (टीडीआर) नियमावलीचा लाभ मूळ म्हणजेच जुने शहरासह विस्तारित औरंगाबाद शहरातील मालमत्तांनाच मिळत आहे. रस्ता रुंदीकरणात गेलेल्या मालमत्तेला किंवा पालिकेने विकासकामांसाठी संपादित केलेल्या मालमत्तांनाच विकास हक्क प्रमाणपत्र नियमावलीचा लाभ दिला जात होता. ज्या मालमत्तेचा टीडीआर देण्यात आला तो टीडीआर इतर कोणत्याही मालमत्तेसाठी वापरता येतो, त्याआधारे त्या मालमत्तेवर जास्तीचे बांधकाम करता येणे शक्‍य होते. टीडीआरची खरेदी-विक्री करुन अशा प्रकारचा व्यवहार केला जात आहे. मात्र, आजपर्यंत सिडको भाग टीडीआरच्या लाभापासून दूर ठेवलेला होता. आता सिडको भागातील मालमत्तांना टीडीआरचा लाभ देण्यासाठीचा कार्यालयीन आदेश प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी काढला आहे. महापालिकेच्या या निर्णयामुळे नागरिकांना घरांवर टीडीआर चढवता येणार आहे. हा निर्णय सिडकोवासीयांसाठी मोठा दिलासादायक मानला जात आहे.

मूळ घरावर आणखी मजले बांधता येणार ; टीडीआरचा मिळणार लाभ
व्हीडीओ कॉलचे स्क्रीन शॉट व्हायरल करून महिलेचा छळ ; आरोपीला अटक

१ एप्रिल २००६ पासून सिडको क्षेत्राचा महानगरपालिका हद्दीत समावेश झालेला आहे. या क्षेत्रासाठी महापालिकेची नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती झाली आहे. मात्र आजपर्यंत टीडीआरच्या लाभाचा निर्णय घेण्यात आलेला नव्हता, आता पालिकेच्या सर्वसाधारण सभेने सिडको क्षेत्रासाठी विकास हक्क प्रमाणपत्र नियमावली लागू करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचे मंजूर प्रस्तावात नमूद केले आहे.

३५ हजार मालमत्तांना होणार लाभ
सिडको भागात सुमारे ३५ हजार मालमत्ता असल्याचे सांगितले जाते. यातील पन्नास टक्‍यांपेक्षा जास्त मालमत्ता अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांच्या आहेत. या उत्पन्न गटातील व्यक्तींना आपल्या मूळ घरावर बांधकाम करण्यासाठी आता टीडीआरचा आधार मिळणार आहे. त्यांना टीडीआर विकत घेऊन मूळ घरावर आणखी मजले बांधता येणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com