आनंददायी... मराठवाड्यात ८ जूनला मान्सून दाखल होणार!

आनंददायी... मराठवाड्यात ८ जूनला मान्सून दाखल होणार!

नोव्हेंबरपर्यंत राहणार पाऊस

औरंगाबाद - Aurangabad

यंदा अनुकूल हवामान लवकर तयार झाल्यामुळे मान्सून वेळेपूर्वीच दाखल होणार आहे. पाच जूनपर्यंत कोकणात दाखल होणारा मान्सून मराठवाड्यात आठ ते दहा जूनपर्यंत येईल, असे हवामान तज्ज्ञांनी सांगितले. यंदाचा पाऊस समाधानकारक असून नोव्हेंबरपर्यंत लांबण्याची शक्यता आहे.

तौक्ते' चक्रीवादळानंतर हवामानात परिणामकारक बदल झाला आहे. मान्सूनपूर्व पाऊस आणि तापमान बदलाने पर्जन्यमानाच्या निर्धारित वेळेतही बदल होणार आहे. मे अखेरीस मान्सूनचा अंदाज जाहीर केला जातो. यावर्षी हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सून एक जून रोजी केरळमध्ये दाखल होणार आहे.

सध्या मान्सूनसाठी पूरक वातावरण असून जूनच्या पहिल्या आठ‌वड्यात पावसाचे आगमन होण्याची शक्यता आहे. दरवर्षी सात जूनपर्यंत पाऊस गोवा आणि कोकण किनारपट्टीत दाखल होतो. यावर्षी पाच किंवा सहा जूनला पाऊस दाखल होणे अपेक्षित आहे. त्यामुळे मराठवाड्यात आठ ते दहा जून दरम्यान मान्सून दाखल होईल, अशी माहिती हवामान शास्त्रज्ञ डॉ. श्रीनिवास औंधकर यांनी दिली. यावर्षी सर्वत्र समाधानकारक पाऊस पडणार आहे. हा पाऊस ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यापर्यंत लांबण्याची शक्यता आहे, असे औंधकर यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com