मान्सून अरबी समुद्रात दाखल; ‘या’ दिवशी कोकण आणि मुंबईत येणार

jalgaon-digital
2 Min Read

मुंबई । Mumbai

उकाड्यांने हैराण झालेल्या राज्यातील नागरिकांना मान्सून (Monsoon) अरबी समुद्रात (Arabian Sea) दाखल झाल्याने दिलासा मिळाला आहे…

पुढील २ ते ३ दिवसांत मान्सून केरळात (Keral) धडकणार असून ५ जूनला कोकणात तर ७ जूनला मुंबईत (Mumbai) दाखल होईल. दरवर्षी १० जूनपर्यंत मुंबईत पावसाला सुरुवात होते.

तसेच यंदा मान्सूनचा प्रवास समाधानकारक असून ३ ते ९ जूनदरम्यान मान्सूनचे राज्यात आगमन होईल असा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. तर १० ते १६ जूनदरम्यान मुसळधार पाऊस बरसेल असा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.

दुसरीकडे देशात उत्तर आणि पूर्व भागातील राज्यांत पुढील दोन-तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच दक्षिणेकडील केरळ आणि तमिळनाडूमध्ये (Keral and Tamil Nadu) काही भागांत जोरदार पाऊस सुरु आहे.

तसेच मान्सून अरबी समुद्रात दाखल झाल्याने राज्यात गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी वादळी पावसाने (rain) हजेरी लावली. त्यामुळे काही भागात फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान, वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशातील उत्तरेकडील भागात जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आदी भागात पाऊस होत असून २३ मे रोजी या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, चंडीगड, दिल्ली, बिहार, झारखंड आदी राज्यांतही पाऊस आहे. बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या बाष्पामुळे पश्चिम बंगाल, ओडिसा आदी राज्यांतही पाऊस आहे. याशिवाय येथे ३०-४० किमी प्रतितास वेगाने वारे देखील वाहण्याची शक्यता आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *