इलेक्ट्रिक बसचा मुहूर्त पडला लांबणीवर!

ठेकेदारच समोर येईना 
इलेक्ट्रिक बसचा मुहूर्त पडला लांबणीवर!

औरंगाबाद- Aurangabd

औरंगाबाद शहरासाठी ३५ इलेक्ट्रिक बसेसची खरेदी करण्याऐवजी त्या भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय स्मार्ट सिटी (Smart City) प्रशासनाने घेतला आहे. यासाठी खासगी एजन्सींकडून निविदा मागविल्या आहेत. मात्र दोनदा मुदतवाढ देऊनही केवळ एकाच खासगी एजन्सीने प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे आता ही निविदा उघडायची की पुन्हा नव्याने निविदा प्रक्रिया राबबायची, याविषयी स्मार्ट सिटी (Smart City) प्रशासनाचा विचार सुरू आहे. यामुळे इलेक्ट्रिक बसचा (Electric bus) मुहूर्त आणखी लांबणीवर पडला आहे.

शहरात सार्वजनिक बस व्यवस्था सुरू करण्यासाठी महापालिकेने स्मार्ट सिटीच्या माध्यमतून डिझेलवरील शंभर सिटी बसेस खरेदी केल्या आहेत. मात्र शहरात आणखी काही बसेसची आवश्यकता आहे. मात्र, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी डिझेलऐवजी इलेक्ट्रिक बसेस (Electric bus) खरेदीची सूचना केली होती. त्यानुसार स्मार्ट सिटी बस व्यवस्थापनाने इलेक्ट्रिक बस खरेदी न करता त्या खासगी एजन्सीकडून भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय घेतला. दोन महिन्यांपूर्वी ३५ इलेक्ट्रिक बसेस (Electric bus) भाडेतत्वावर घेण्यासाठी निविदा प्रसिद्ध केली होती. सुरुवातीला या निविदेला प्रतिसादच मिळाला नाही. त्यामुळे त्यांना दोन वेळा मुदतवाढ दिली गेली.

मात्र, या मुदतवाढीनंतरही केवळ एकाच खासगी एजन्सीचा प्रतिसाद मिळाला. निविदेच्या नियमानुसार पहिल्यावेळी किमान तीन निविदा येणे अपेक्षित आहे. तरच निविदा उघडली जाते. अन्यथा दुसऱ्यांदा निविदा मागवाव्या लागतात. अपवादात्मक परिस्थितीत या नियमाला सूट असते. सध्या तरी ही एकमेव निविदा उघडायची की नव्याने निविदा मागवायची यावर सिटी बस (City Bus) व्यवस्थापन विचार करीत आहे. स्मार्ट सिटीचे (Smart City) मुख्य कार्यकारी अधिकारी तथा मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय (Municipal Administrator Astik Kumar Pandey) यांच्याकडे याबाबतची संचिका सादर केल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com